Skip to content
ग्रामपंचायत खरवते

ग्रामपंचायत खरवते

Kharavate

Menu
  • Menu
    • मुखपृष्ठ
    • गावाविषयी
    • गावातील मंदिरे व श्रद्धास्थाने
    • ग्रामपंचायत कामकाज
    • गावातील उद्योग – व्यवसाय
    • गावातील शैक्षणिक सुविधा
    • गावातील विकासकामे
    • गावातील उल्लेखनीय व्यक्ती
    • ऐतिहासिक वारसास्थळे
    • गावातील जलव्यवस्था
    • जैवविविधता
    • आपली ग्रामपंचायत
    • व्हिडिओ गॅलरी
    • संपर्क

गावातील जलव्यवस्था

Facebook Twitter Whatsapp Instagram

गावातील जलव्यवस्था

खरवते गावात एकूण ९ वाड्या आहेत. त्यापैकी गावठणवाडी, कोंडवाडी, वाणीवाडी, बौद्धवाडी, कोष्टीवाडी, गुरववाडी या ६ वाड्यांमध्ये प्रत्येकाच्या वैयक्तिक विहिरी आहेत. हेदाडवाडी, माटलवाडी, मधलीवाडी या ३ वाड्यांना एकाच सार्वजनिक विहीरीवरून पाणीपुरवठा होतो. यासाठी माटलवाडी मध्ये ३०,००० लीटर क्षमतेची साठवण टाकी आहे. 
जलसंधारणासाठी गावात ग्रामस्थांनी ओढ्यांवर बंधारे बांधले आहेत. तसेच गावात काही पारंपरिक तळी, झरे, असे जलस्रोत आहेत. 

हेदाडवाडी, माटलवाडी आणि मधलीवाडी या ३ वाड्यांना या विहीरीतून पाणीपुरवठा होतो. या ३ वाड्यांमधील सुमारे १५० कुटुंबे व सुमारे ५०० एवढ्या लोकसंख्येला पाणीपुरवठा होतो. 

माटल वाडी येथील साठवण टाकी

बंधारे

कोष्टीवाडी येथील वहाळावर बांधलेला बंधारा. याचा उपयोग भूजलसंधारणासाठी होतो .

पारंपरिक पाणवठ्याच्या जागा

गावठणवाडी येथील श्री जांगलदेव देवस्थानाच्या परिसरातील तळी. या तळीमध्ये जवळच्याच झऱ्यामधून पाणी येते व ते वर्षभर असते. या तळीतील पाणी पिण्यासाठी तसेच धार्मिक कार्यांसाठी वापरले जाते. 

खरवते गावातील कोंडवाडी येथील ब्राह्मणदेव झरा. हा बारमाही झरा श्री ब्राह्मणदेव देवस्थान परिसरात आहे. गुरांना पाणी पिण्यासाठी या झऱ्याचा उपयोग होतो.  

खरवते येथील या वहाळात बारमाही झऱ्यातून पाणी येते. या जागेला “पाडली सखल” असे स्थानिक नाव आहे. गुरे पाणी पिण्यासाठी या वहाळावर जातात. 

नवीन योजना

जल जीवन मिशन योजने अंतर्गत मधलीवाडी येथे १४ हजार लीटर क्षमतेची टाकी व गुरव वाडी येथे नवीन विहीर बांधण्यात आली आहे. ही योजना प्रामुख्याने मधलीवाडी येथे पाणीपुरवठा करण्यासाठी आहे.

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वाणीवाडी मध्ये वाण्याची कोंड येथे १७/१२/२०२४ रोजी ग्रामस्थांच्या श्रमदानातून बांधलेला बंधारा. 

शुभेच्छुक...

ग्रामपंचायत खरवते

© ग्रामपंचायत खरवते 2025. Powered by WordPress