श्री नवलाई ही खरवते गावाची ग्रामदेवता आहे. हे मंदिर खरवते गावतील गावठण वाडीमध्ये वसलेले आहे. ही देवी मूळ केळवडे पाथर्डे या गावातील असून मुघल राजवटीच्या काळात देऊळ बाटवले जाऊ नये यासाठी ती देवी रागाने तेथून कातळ फोडून निघाली आणि खरवते मधील कोंडवाडी मध्ये येऊन बसली अशी आख्यायिका गावकरी सांगतात. देवीचे सध्याचे नवे मंदिर हे गावठणवाडी मध्ये बांधलेले आहे. तेथे नवलाई देवी बरोबरच पावणाई देवीची मूर्ती देखील आहे. देवस्थानाच्या परिसरात पुरातन वृक्ष आढळतात. येथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो.
© ग्रामपंचायत खरवते 2025. Powered by WordPress